अनामिक ओढ
अस्वस्थ मी अशांत का कसली अनामिक ओढ ही
सांगेल का मजला कुणी सांगेल का मजला कुणी
कळते मला हे
व्यर्थ ते
सुख
दुखः
असते
जीवनी
नाराजी ना दुःखामुळे मन सुखेहि ना उचंबळते
मग काय जे छळते असे कसले अनामिक हे पिसे
मग काय जे छळते असे कसले अनामिक हे पिसे
सांगेल का मजला कुणी सांगेल का मजला कुणी
किती पालथी ती देऊळे सत् संग आणिक कीर्तने
दान-धर्म श्रमदान ही काय किती करु पाहिले
त्या पोकळीला बुजविण्या किती काय केले पामरे
मित्र नाती छंदातहि रे सतत गुंतुनी घेतले
मित्र नाती छंदातहि रे सतत गुंतुनी घेतले
पण त्यांच्या ही नादात तो नाद अनाहत गुंजतो
बाहेर का कुणी छेडते का आतुनी तो रुंजतो
मग जाऊनिया
बैसले
माझ्या मनाच्या अंतरी
दुर्लक्षिण्या त्या ओढीला त्या वेडाला करण्या दुरी
हास्य अचानक किणकिणले मजलाच कुणी का ते हसले
वेडीस काहीहि ना कळले पण हास्यातची
त्या गुंगुन गेले
त्या अथांग डोही डुंबले त्या नाद जली विरघळले
त्या नाद सुगंधी हरवुनिया मग नाद तरंगच जाहले
अन् नाद तो संवाद तो विश्वंभराशी साधता
रहस्य ह्या विश्वातले निमिषात एका उलगडता
कुठे ओढ अन् काय पिसे मजला न काही जाणवले
कोलाहलातहि जगण्याच्या शांत निवांत मग झाले
रश्मि २४/१/२०१६
No comments:
Post a Comment