Monday, 25 January 2016





THE MAZE


Everyone enters the maze of life with instinctive knowledge of how to get inside like Abhimanyue . Then he runs to find the solution , the opening, the end. This solution is different  for each one as the maze is his own distinct maze. He himself has to find his unique solution for the ultimate way out. If he does not succeed then he has to perish , again to enter another maze.... for another solution... 

Rashmi 15/6/2015

Sunday, 24 January 2016

अनामिक ओढ

अनामिक ओढ

अस्वस्थ मी अशांत का कसली अनामिक ओढ ही
सांगेल का मजला कुणी सांगेल का मजला कुणी

कळते मला हे व्यर्थ ते सुख दुखः असते जीवनी
नाराजी ना दुःखामुळे मन सुखेहि ना उचंबळते
मग काय जे छळते असे कसले अनामिक हे पिसे
सांगेल का मजला कुणी सांगेल का मजला कुणी

किती पालथी ती देऊळे सत् संग आणिक कीर्तने
दान-धर्म श्रमदान ही काय किती करु  पाहिले
त्या पोकळीला बुजविण्या किती काय केले पामरे
मित्र नाती छंदातहि रे सतत गुंतुनी घेतले 

पण त्यांच्या ही नादात तो नाद अनाहत गुंजतो
बाहेर का कुणी छेडते का आतुनी तो रुंजतो
मग जाऊनिया बैसले माझ्या मनाच्या अंतरी
दुर्लक्षिण्या त्या ओढीला त्या वेडाला करण्या दुरी

हास्य अचानक किणकिणले मजलाच कुणी का ते हसले
वेडीस काहीहि ना कळले पण हास्यातची त्या गुंगुन गेले
त्या अथांग डोही डुंबले त्या नाद जली विरघळले
त्या नाद सुगंधी हरवुनिया मग नाद तरंगच जाहले

अन् नाद तो संवाद तो विश्वंभराशी साधता
रहस्य ह्या विश्वातले निमिषात एका उलगडता
कुठे ओढ अन् काय पिसे मजला न काही जाणवले
कोलाहलातहि जगण्याच्या शांत निवांत मग झाले


रश्मि  २४/१/२०१६